बल्लारपूरात पालिका निवडणूक निकाला बाबत धाकधुक वाढली…

0
73

 

कॉलेज कट्टा-

बल्लारपूर-२ डिसेंबर रोजी झालेल्या पालिका निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने एवढ्या दिवसात निकाल फिरवल्या जाऊन भाजप ला मोठा लाभ मिळेल,अशी धाकधुक विरोधी पक्षांच्या उमेदरांना लागली आहे.विशेष म्हणजे या संबंधाने आम आदमी पार्टी आणी राष्ट्रीय काँग्रेस ने स्ट्रॉंग रूम परिसरात जॉमर लावण्यासाठी मुख्याधिकारी आणी प्रशासकाकडे मागणी केली आहे.

एव्हीएम च्या प्रामाणिकते बाबत राज्यातच नव्हे देश भरात शंका उपस्थित होत असतांना निवडणूक आयोग आणी न्यायालयाने मतदारांचे समाधान होईल असा एकही निकाल दिला नाही.मतचोरीचा मुद्दा असो,एव्हीएम हेकिंगचा मुद्दा असो,मशीन बिघाड होऊन दुसऱ्या चिन्हावर बटन दाबल्यास कमळ चिन्हा समोरील बटन सुरु होण्याचा मुद्दा असो यावर अध्यापही मतदारांना कोणतेही समाधान मिळाले नसल्याने २१ डिसेंबर चे निकाल सत्ताधारी भाजप च्या बाजूने लागतील का..? अशा चर्चांना उत आला आहे.
बल्लारपूर नगर परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांचा कल बघता शिवसेना (उबाठा) च्या युवा उमेदवार चैताली दीपक मुलचंदानी व काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अल्का अनिल वाढई यांच्यातच खरी लढत झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान भाजप ने अनेक दिग्गज माजी नगर सेवकांच्या एन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने याचा मोठा फटका भाजपला बसणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती.मात्र भाजप पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्ष पदा सह अंदाजे १६ नगर सेवकांसह विजयी होण्याचा विश्वास आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सूचक विधान समोर आले आहे.”२१ डिसेंबर रोजी निकाल आल्यानंतर विरोधी एव्हीएम वर खापर फोडून मोकडे होतील” असे त्यांनी म्हंटले आहे.

शहरात पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी शिव सेना (उबाठा) आणी राष्ट्रीय काँग्रेसला पसंती दर्शवल्याने नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षात “कांटे की टक्कर” झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत असले तरी २१ तारखेला कुठली जादूची कांडी फिरून धक्कादायक निकाल लागतील का ? अशी धाकधुक प्रत्येक उमेदवारांसह काँग्रेस शिवसेना समर्थित मतदारांना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here