निवडणूक व निकालाच्या पार्श्व भूमीतून बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च…

0
50

 

कॉलेज कट्टा बल्लारपूर-
पोस्टे बल्लारपूर अंतर्गत आज दिनांक 19/12/2025 रोजी बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे अनुषंगाने दिनांक 20/12/2025 रोजी होणाऱ्या प्रभाग क्र 9 चे निवडणूक तसेच दिनांक 21/12/2025 रोजी होणाऱ्या मतमोजणी संबंधाने रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च 11 वाजता पोस्टे बल्लारपूर येथून सुरु होऊन नवीन बस स्टॉप ते बालाजी मंदिर, ते छोटा हनुमान मंदिर ते डॉ झाकीर हुसेन वॉर्ड ते महिला महाविद्यालय ते ट्रेंड्स मॉल ते परत दुपारी 12 वा पोस्टे येथे समाप्त झाली. रूट मार्च मध्ये 06 अधिकारी, 41 अंमलदार, 20 सैनिक उपस्थित होते.

या रूट मार्च मुळे बल्लारपूरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर धाक तथा अंकुश लागून निवडणूक व निकाल प्रक्रिया शांततेत पार पडावी अशी पोलीस निरीक्षकांची भूमिका होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here