चैताली मूलचंदानी यांनी मानले मतदार आणी सहकाऱ्यांचे आभार…

0
105

 

कॉलेज कट्टा
बल्लारपूर- शिवसेना (उबाठा)च्या नगराध्यक्ष पदाच्या युवा,सुशिक्षित,अभ्यासू उमेदवार चैताली मुलचंदानी यांनी मतदार,पक्षातील नेते,कार्यकर्ते आणी मतदार जनतेचे विनम्र आभार मानले आहेत.काँग्रेस,भाजप या प्रथापित पक्षांना कडवी झुंज देत त्यांना 10 हजार 607 मते मिळाली आहेत.

रानंगणात उतरल्यावर यश-अपयश येतेच! पण या निवडणुकीने बरेच काही शिकवले,मतदारांनी मतांच्या रूपात भरभरून दिलेल्या प्रेमाला कधीच विसरता येणे शक्य नाही.मिळालेला अनुभव,जनतेचे प्रेम,वरिष्ठांचा आर्शीवाद हिच आपली ताकद असल्याची प्रतिकीय चैताली मुलचंदानी यांनी कॉलेज कट्टाशी बोलतांना व्यक्त केली.
तसेच शिवसेनेचे नगरसेवक पदासाठी विजयी उमेदवार विनोद यादव (सिक्की भैया), रजनी मुलचंदानी,काजल तोटावार, रंजिता बिरे आणि मनोज बेले यांचे हार्दिक अभिनंदन करत या विजयाने संपूर्ण संघटनेला सन्मान आणि उत्साह मिळाला आहे.आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष पदासाठी अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचे, कार्यकर्त्याचे, स्वयंसेवकांचे, समर्थकांचे आणि नागरिकांचे मी मनापासून आभार मानत ही निवडणूक आपण जिंकली नाही तरी तुमच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने मी निश्चितच लोकांची मने जिंकली. हा माझ्यासाठी कोणत्याही विजयापेक्षा मोठा सन्मान आहे.
तुमच्या प्रेम, विश्वास आणि कठोर परिश्रमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. येणाऱ्या काळातही आम्ही अशाच एकतेने आणि उत्साहाने शहरासाठी काम करत राहू अशी भावनिक साद ही त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here