तिकिट वाटपात एकाधिकारशाही केल्याने भाजपचा धुव्वा उडाला? बल्लारपुरात चर्चेला उधाण…

0
85

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- आ.सुधीर मुनगंटीवार यांचे झंजावाती विकास कार्य्,त्यांची लोकप्रियता आणी भाजपशी जोडल्या गेलेली सर्वसामान्य मतदारांची नाळ या एकूण बाबी भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या असल्या तरी स्थानिक नेतृत्वाने तिकिट वाटपात एकाधिकार शाही गाजवत जनतेच्या सेवेत अविरत राबणाऱ्या उनेदवारांच्या ऐन वेळेवर तिकिटा कापून उमेदवारी नाकारल्याने बल्लारपूरात भाजपचा धुव्वा उडाल्याचे राजकीय जानकारांचे मत आहे.
बल्लारपूरातील शीर्ष नेतृत्वाने तिकिट वाटपात एकाधिकार शाही गाजवत एकाच कुटुंबातील तिघांना पक्षाचे तिकिट दिले.त्यातच सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या पण या नेत्यांची ‘जी-हुजुरि’ न करणाऱ्यांना हेतू पुरस्पर टार्गेट करत ऐन वेळेवर उमेदवारी न दिल्याने विशेषतः वस्ती विभागात भाजपला मोठी खिंडार पडली.पक्षासाठी आणी जनतेसाठी काम करणाऱ्यांना अचानक पक्षाने उमेदवारी न दिल्याने याचा विपरीत परिणाम शहरातील मतदारांवर झाला.त्यामुळेच नगराश्यक्ष पद अल्पमतांनी हुकले…आणी नगर सेवक निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पक्षाची उमेदवारी देतांना शाहनिशा न करता फक्त आपला न्यूँनगंड लपविण्यासाठी आणी पाया पडून उदो उदो करणाऱ्या भक्तांना खुश करण्यासाठी उमेदवारीची रेवडी वाटल्यानेच भाजपचा दारुण पराभव झाल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत असून, संधीसाधू पणा करत फक्त त्यांच्या प्रत्येक कामात होकारार्थी मान हलवणाऱ्यांनाच उमेदवारी दिल्या गेल्याने आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांची यांनी प्रेत यात्रा काढल्याचे मत उपस्थित करत स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी रचलेल्या कट कारस्थानाची चौकशी पक्षातील वरिष्ठ नेतृवाने करावी अशी मागणी पक्षा अंतर्गत होत असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here