विधवेने जीन्स पॅन्ट घातला म्हणून कुटुंबाकडून बेदम मारहाण…

0
76

 

कॉलेज कट्टा न्यूज
पुणे-जिन्स पॅन्ट घातला म्हणून एका विधवा महिलेल्या तिच्याच कुटुंबातील लेकांनी बेदम मारहाण केल्याची घटना राज्याचे संस्कृतिक माहेर घर संबोधल्या जाणाऱ्या पुणे शहरात घडली असून,या मारहाणीत पीडित महिलेचा हात मोडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार 33 वर्षीय ही पीडिता तळजाई वसाहत परिसरात आपल्या चार मुलांसह राहते.ही महिला कचरा वेचक असून 30 डिसेंबर रोजी जिन्स पॅन्ट लावून आपल्या घरासमोर उभी असतांना तिच्या सासूने तिला जीन्स घालून बघितल्यावर तिचा राग अनावर झाला.रागच्या भरात तीने पीडितेचे केस ओढून तिथेच मारहाण सुरु केली.तेवढ्याच तिचा दीर आणी मुलगी ही तिथे आले.तिघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली.दिराने तिचा हात मुरगाळल्याने तिचा हात मोडला आहे.सद्या तिच्यावर ससून रुग्णाल्यात उपचार सुरु असून,तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीर,मुलगी आणी सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुरीगामी महाराष्ट्रातील पुणे येथे ही घटना घडल्याने महिलांच्या स्व-स्वतन्त्र्याचा मुद्दा एरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here