कॉलेज कट्टा टीम-
मुंबई-राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदाची निवड ही मतदाना द्वारे लोकशाही पद्धतीने होणार असून,संबंध भारतातील पत्रकार संघटनेसाठी ही निवडणूक आदर्श ठरणार आहे.
राज्याध्यक्ष पदासाठी सन २०२६ साठीची निवडणूक प्रक्रिया लोकशाही व संघटनात्मक नियमांनुसार राबविण्यात येत आल्याची माहिती राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिली आहे.
ऑनलाईन पद्धतीने पार पडणाऱ्या या निवडणूककित प्रत्येक सभासद आणी पदाधिकाऱ्यांनी भाग घ्यायचा असून,त्यानुसार निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमाचे टप्पे ठरविले जाणार आहे.
कार्यक्रमाचे टप्पे तारीख१)निवडणूक प्रक्रियेची सुरुवात01/01/2026,२)उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख. 15/01/2026,३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30/01/2026, ४)मतदान 12/02/2026.५)निवडणूक निकाल जाहीर 13/02/2026
मतदानासाठी मतदारांची पात्रता –या निवडणुकीत फक्त तेच पदाधिकारी / सभासद मतदानास पात्र असतील ज्यांनी 2026 चे अधिकृत ओळखपत्र घेतलेले आहे, किंवा ज्यांनी संघाची २०२६ साठीची अधिकृत फी ₹५००/- भरलेली आहे.वरील अटी पूर्ण न करणाऱ्या कोणत्याही पदाधिकारी / सभासदास मतदानाचा अधिकार राहणार नाही.
उमेदवारी संदर्भातील अटी व नियम :राज्याध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरावा.अर्जासोबत ₹५,०००/- (पाच हजार रुपये) इतकी डिपॉझिट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.उमेदवारास ५०% पेक्षा कमी मते मिळाल्यास डिपॉझिट रक्कम जप्त करण्यात येईल.५०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास डिपॉझिट रक्कम नियमानुसार परत करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज न आल्यास लागू होणारी विशेष तरतूद :जर निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पदाधिकारीने राज्याध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला नाही, तर संघात आधीपासून ठरविलेल्या धोरणानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल :
किमान १५ ते २० जिल्ह्यांचा अधिकृत पाठिंबा मिळवणाऱ्या पदाधिकाऱ्याचीच निवड करण्यात येईल.अशा परिस्थितीत सदर निवड कोर कमिटी व विश्वस्त कमिटी यांच्या संयुक्त निर्णयाने करण्यात येईल.निवड झाल्यानंतर संबंधित कोर कमिटी व विश्वस्त कमिटी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल.
प्रचार व सहभाग :उमेदवारी अर्ज मंजूर झाल्यानंतर उमेदवारांना संघटनात्मक शिस्तीत राहून प्रचार करण्याची मुभा राहील.सर्व पदाधिकारी व सभासदांनी ही निवडणूक प्रक्रिया गंभीरतेने, एकजुटीने व संघाच्या हितासाठी पार पाडावी, असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (केंद्रीय / निवडणूक समिती यांच्या वतीने) करण्यात आले आहे.




