“जमीन उसकी,खेल उसका,राजा उसका,प्यादे उसके” मग जिंकणार तोच ना..?

0
80

“जमीन उसकी,खेल उसका,राजा उसका,प्यादे उसके” मग जिंकणार तोच ना..?

कॉलेज कट्टा न्यूज
मुंबई-महानगर पालिका निवडणूक मतदानाच्या आधीच राज्यात सत्ताधारी पक्षाचे एकूण 64 नगरसेवकांचा बिनविरोध विजय निश्चित झाल्याने साम, दाम, दंड भेद नितीचा वापर करून सत्ताधारी निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी माईंडसेट गेम करत असून अर्जबाद करण्यात आलेल्या किंवा निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची कास्सुन् चौकशी झाल्यात मोठे सत्य बाहेर येण्याची शक्यता राजकीय जानकरांकडून वार्तविली जात असतांनाच मननिर्माण सेना या बिनविरोध निवडणूक प्रक्रिये विरुद्ध कोर्टात जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.

बाहुतांश ठिकाणी निवडणुकी आधीच भाजप उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे.भाजप आणी मित्र पक्षांनी या विजयाचे श्रेय महायुतीचे नेते प्रधानमंत्री मोदी,गृहमंत्री अमित शहांना देत गुलाल उधडला आहे.दरम्यान अशा पद्धतीने,आणि एवढ्या संख्येने मतदाना आधीच बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचा आकडा धक्कादायक असून यात बल,छल,आणी पैशाचा मोठा वापर झाल्याचे उघडपणे बोलल्या जात आहे.स्वातंत्र्या नंतर अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाला अनेक उमेदवार बिनविरोध पद्धतीने
कधी निवडून आणता आले नाही.आजपर्यंत पार पडलेल्या कुठल्याही निवडणुकीत घडला नाही,तो चमत्कार मोदी,शहा आणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात होतोय;यावरही अनेक मते मतांतरे असून “जमीन उसकी,खेल उसका,राजा उसका प्यादे उसके” मग जिंकणार तोच ना..? असा एक मतप्रवाह निर्माण झाला असून,असा मतप्रवाह निर्माण करण्यासाठीच मतदारांच्या मेंदूशी खेडणारा माईंड गेम पद्धतशीर खेळल्या जात असल्याची शक्यता जानकरांनी वर्तवली आहे.

दरम्यान या बिनविरोध निवडणुकी विरुद्ध राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोर्टाचे दार थोटावणार असल्याची विश्वस्नीय माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here