५० लाखांच्या नकली देशी दारू अड्डयावर धाड…राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई….
कॉलेज कट्टा न्यूज
अकोला- जिल्ह्यातील
पातूर-वाशिम रोडवरील एका शेतातील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात नकली देशी दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकून सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे.
या गोडाऊनमध्ये टॅंगो पंच व रॉकेट या ब्रँडची नकली देशी दारू मोठ्या प्रमाणात साठवून विक्रीसाठी बाजारात विकल्या जाणार होती.या कारवाईत अकोला जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक कांबळे, सोनार, भुरळ यांच्यासह भरारी पथक सहभागी होते.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती असून,या नकली देशी दारूचा चालक मालक कोण?याचा शोध घेण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग करित आहे.




