वेशभूषा स्पर्धेत रुपाली सोनारकर यांचा पहिला क्रमांक…

0
169

 

कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर- नगर परिषद अंतर्गत सुवर्णं जयंती योजना संलग्नीत बचत गटांचा प्रमुख संघ मदर टेरेसा संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात संपन्न झाली.
यात महिलांच्या विविध स्पर्धा सोबत वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत रूपाली सोनारकर यांनी पहिला क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक रूपा पवार,तर तिसरा क्रमांक प्रियंका बहादे यांनी पटकावला.कर्यक्रमांचे पुरस्कार वितरण एड.मेघा भाले यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मीनाक्षी गलगट यांनी केले.कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मदर टेरेसा संघाचे अध्यक्ष बेबी केसकर,सहसचिव ज्योती गहलोत , कुसुम कांबळे,स्मिता ठेंगडे,सारिका महाजन,मनीषा दामोदर अश्विनी लोखंडे किरण मेश्राम,प्रीती काटकमवार, अनिता नंदावार, काजल भासारकर, प्रियंका नाईक,रूपाली सोनारकर,वैशाली भुरसे,नवनिर्वाचित नगरसेविका एड. मेघा भाले व रंजीता बिरे यांचा सत्कार करण्यात आला.विविध कार्यक्रमाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here