मकोका च्या फरार आरोपींना वर्ध्यातून अटक

0
62

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे
दाखल असलेल्या अप. क्र. ७५८/२०२५ मधील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) तसेच भारतीय न्याय संहिता व हत्यार कायद्यांतर्गत गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश उर्फ मोनू बिरजू बहुरिया (३४), रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड, बल्लारपूर यास चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाने सावंगी, जिल्हा वर्धा येथून अटक केली आहे.

सदर गुन्ह्यात कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता, सहकलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा तसेच मोक्का कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) लागू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

सदर कारवाई चंद्रपूर जिल्हापोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोअं. रुपेश पराते, शेखर माथनकर, सुरज शेडमाके, योगेश पिदूरकर आणि रामकांत गाव्हणे यांच्या मोक्का पथकाने विशेष मेहनत घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here