जय भीम बहुउद्देशीय संस्थे द्वारे विदर्भस्थरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

0
117

 

कॉलेज कट्टा बल्लारपूर-
अस्मितेसाठी रक्ताचे सिंचन करणाऱ्या शूरवीर योध्यांना अभिवादन करण्यासाठी
भीमा कोरेगांव विजय स्तंभ प्रतिकृती शौर्यदिन उत्सव-2026 बल्लारशाह येथे साजरा करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा भाग म्हणून
विदर्भस्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून,प्रथम पारितोषिक ₹5555/-रोख व सन्मान चिन्ह
(अब्दुल करीम शेख माजी अध्यक्ष, बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी व माजी नगर सेवक, बल्लारपूर यांचे मार्फत)
दुसरे बक्षीस ₹3333/-रोख व सन्मान चिन्ह (उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांचे मार्फत)
तिसरे पारितोषिक ₹2222/-रोख व सन्मान चिन्ह
( काजल राकेश शिवणकर सामाजिक कार्यकर्ता यांचे मार्फत)या स्पर्धेचे विषय 1) भारतातील जातींची खरी सामाजिक स्थिती आणि राजकिय हस्तक्षेप.2) भारतातील प्रसार माध्यमांची (मिडीया) लाचारी असे या वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहे.

नियम व अटी-1) या स्पर्धेत सहभागी 200 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
2)स्पर्धक 18 वर्षा वरील असावा.3)भाषा मराठी/हिंदी / इंग्रजी (वेळ ४+१ मिनीटे) स्पर्धा संपल्या नंतर लगेच बक्षिस वितरण.4)युट्यूबची भाषणे कॉपी केल्यास ग्राह्य पकडण्यात येणार नाही.5)परिक्षकांचा निर्णय अंतीम व बंधनकारक असेल.ही स्पर्धा गुरूवार, दि. 31 डिसेंबर 2025 ला, दुपारी 12 वा.सुरु होईल.स्पर्धेत प्रवेश घेण्याचा अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2025 रात्री 9 वाजे पर्यंत स्थळ : विजय स्तंभ परिसर, जय भीम चौक, बल्लारशाह, जि. चंद्रपूर, विदर्भ.स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी 9850352209, 880622022, 9890065265 संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here