उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा नागपुरात निषेध..!

0
111

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा नागपुरात निषेध..!

कॉलेज कट्टा- नागपूर
‘स्कॉलरशीपसाठी एकाच कुटुंबातले ५-५ जण पीएचडी करू लागले’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.आज मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 ला दुपारी 3 वाजता, संविधान चौक, नागपूर मानव अधिकार संरक्षण मंच HUMAN RIGHTS PROTECTION FORUM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक विद्यार्थी कृती समिती, नागपूर च्या वतीने धारणा आंदोलन करण्यात आले.

बार्टी, सारथीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्याला अभ्यासपूर्ण उत्तर देण्यासाठी नागपुरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.आंदोलना दरम्यान शरद पवार राज्यसभा खासदार,सुप्रिया सुळे लोकसभा खासदार, अजित पवार विधानसभा आमदार, (उपमुख्यमंत्री), सुनेत्रा पवार लोकसभा पराभूत तर लगेच राज्यसभा खासदार, रोहित पवार विधानसभा आमदार अशा एकाच घरातील अनेक लोक आमदार खासदार मंत्री असलेलं अजित पवारांना चालत,पण एका घरातून 5-5 लोक पीएचडी केलेलं अजित पवारांना चालत नाही का? स्कॉलरशिप साठी पीएचडी करतात,असे बेताल विधान करण्याआधी आपण आणी आपले कुटुंबिय कसे राजकीय फायदा घेत आहोत हे अजित पवार विसरलेत का..?? असे प्रश्नही आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here