विश्लेषण नरेंद्र सोनारकर
आ.सुधीर मुनगंटीवार नावाच्या वादळाला चौबाजूनी घेरण्याचा प्रयत्न होत आहे…पक्षातच त्यांची विद्वत्ता,अभ्यास,उंची,अनुभव,पक्षाप्रती प्रामाणिक पणा,विकासा प्रती दूरदृष्टी,त्यांचा स्वाभिमानी बाणा,त्यांचा कणखर पणा गौण ठरवत टोमणे आणी सल्ल्यांचे घोट पाजले जात आहेत.कारण…???
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तुम्ही खरंच चुकला आहात..! होय तुम्ही चुकलातच…!!
1)कारण जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे अधिराज्य होते,गाढवालाही उमेदवारी मिळाली तरी तो निवडून येतो अशी आख्याखिका असतांना त्या प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला उमेदवार मिळत नव्हता… पराभव समोर दिसत असतांना लोकसभा आणी विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही समोरे गेलात…
तुम्ही चुकलात…!
2)कारण लायकी,विद्वत्ता, संघटन कौशल्य,पक्षा प्रती इमानदारी,शिक्षण या साऱ्या कसोटीत निपुण असतांना मुख्यमंत्री पदाचा स्वतःहून आग्रह धरला नाही…तुम्ही चुकलात… कारण पदासाठी लाड गाळू पणा करत शेपूट हलवणे तुम्हाला कधीच जमले नाही.जिल्यातीलच नव्हे विदर्भातील जनतेची नाराजी ओढवून घेत दुसऱ्या फडीतील सर्वात मोठा नेता असतांना समोर असलेल्या मुख्यमंत्री पदावर दावेदारी न करता
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून पक्षनिष्ठा दाखवली…
तुम्ही चुकलात भाऊ..!
3)कारण पक्षादेश सर्वोपरी माणून आपल्या पेक्षा प्रत्येक बाबीत जयुनियर असलेल्यांना तुम्ही मोठं केलं.त्यांचं अनावश्यक नेतृत्व स्वीकारून तुम्ही अविरत जनसेवा केलीत.
भाऊ तुम्ही चुकलात..!
4)कारण आजतगायत एकही जातीयवादी आणी वादग्रस्त विधान तुम्ही केलेलं नाही… राजकारण करतांना तुम्ही हिंदू,मुस्लिम,दलित,ब्राम्हण असा भेदाभेद न करता समताधिष्ठित राजकारणातून समाजकारण साधत प्रत्येक जाती धर्मात हक्काचे स्थान आणी लोकप्रियता मिळवत सातव्यांदा आमदार झालात.
हो भाऊ तुम्ही चुकलातच…!
5)कारण पक्षाने राज्याच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतांना राज्याच्या प्रत्येक गल्लीबोळात,शेवटच्या माणसा पर्यंत पक्ष पोहचवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही सन्मान दिला…पक्षाच्या विचारसरणीला विकासाचं स्वरूप देत राज्य आणी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून समर्पित कार्यकर्ते निर्माण केले..
भाऊ तुम्ही चुकलात..!
6)कारण अस्तिनीतील सपोल्यांना नकळत दूध पाजून मोठे केले…पायात स्लीपर लावून फिरण्याची लायकी नसलेल्यांना फॉर्चूनर चा मालक बनण्या इतपत लायक बनवले…
7)आतातर तुम्ही भयंकर चुका केल्यात…विदर्भातील शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी,कामगार,शेतमजूर,महिला भगणीच्या न्याय हक्कासाठी सभागृहात जाब विचारत सत्ताधारी मंत्री संत्र्यांना घाम फोडला…एक उच्च विद्या विभूषित, अभ्यासू आमदार काय करू शकतो याची प्रचिती सत्तेला आणी जनतेला दाखवून दिली.
8)आणी सर्वात मोठी चुक म्हणजे आमदार होण्यासाठी धरपळत या-त्या पक्षाचे तिकिट मागत शेवटी स्वपक्षातून निवडून येणाऱ्या “आयाराम” चे कान टोचले…पक्षातील आयारामांना त्यांची जागा दाखवत रणशिंग फुंकले…
9)पक्षनिष्ठा,त्याग,कामाचे सातत्य आणी प्रत्येक गरजू,अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी दाखवलेला कणवाळू पणा,बंद मुठीत त्यांची आजवर केलीली अनमोल मदत आणी त्यातून निर्माण होणारे आपले आणी पक्षाचे समर्थक…आपल्या हातून घडलेल्या या गंभीर चुका जनता कधीच विसरू शकत नाही…स्वतःला वरिष्ठ,श्रेष्ठ वैगेरे समजणाऱ्यांनीही या चुका विसरू नयेत एवढंच..!




