नगर पालिकेच्या निर्माणाधीन कामावर कामगाराचा मृत्यू

0
135

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर :पलीकेच्या निर्माणाधीन बांधकामावर कार्यरत एका कामगाराचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून,बल्लारपूर पोलीस काय कार्यवाही करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामगाराचा मृत्यू आजारपणामुळे की आणखी काही..?
हीरालाल सुंदरसिंह (२८), रा. छुरिया, गेंडाटोला, मातेखेड़ा, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव आहे.सद्या बल्लारपूर नगर परिषदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून हीरालाल हे तेथे मजूर म्हणून काम करत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती असून, त्यांच्यावर बल्लारपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कामाच्या ठिकाणीच किंवा कामादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

श्वविच्छेद अहवाला नंतर उघडेल मृत्युचे गूढ….
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.या अहवाला नंतरच मृत्युचे गूढ उलघडणार आहे.
विशेष म्हणजे मृतक कामगाराला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या घटनेबाबत अधिक संशय व्यक्त केला जात आहे.यात नगर परिषद व संबंधित बांधकाम ठेकेदार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमांनुसार बांधकामस्थळी कामगारांसाठी आरोग्य व सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना, उपचारांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आज सकाळी मृतकाचे नातेवाईक बल्लारपूरात दाखल झाले.त्यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह तब्यात घेतला.अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांनी मृतदेह छत्तीसगड येथे घेऊन गेल्याची माहिती आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जंगमवार करीत असून, प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here