क्रूरकर्मा पित्याने आपल्या तीन दिवसाच्या चिमूर्डीची केली हत्या…

0
114

 

कॉलेज कट्टा न्यूज
जळगाव-विज्ञान युगातही अज्ञाना पोटी माणूस नराधम बनला असून मुलगा किंवा मुलगी हे पुरुष गुणसूत्रावरून ठरत असल्याचे नाकारत एका कुरकर्मा पित्याने चौथीही मुलगी झाल्याचा राग मनात बाळगून एका तीन दिवसाच्या चिमुर्डीला लाकडी दांड्याने मारून हत्या केल्याच्या घटनेने सम्पूर्ण राज्य हादरले आहे…

शवविच्छेदन अहवालाने या क्रूरकर्मा पित्याचे फुटले बिंग-
सुरुवातीला कुटुंबीयांनी आंघोळ करताना मुलगी पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला होता. चिमुकलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यांनी वैद्यकीय अहवालात मुलीचा मृत्यू अपघाती नसून टणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. तपासादरम्यान कृष्णा लालचंद राठोड या पित्यानेच चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

नेमकं काय घडलं?
कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे या पाषाणहृदयी बापाचे नाव आहे. कृष्णाला याआधी तीन मुली होत्या. चौथ्या वेळी तरी वंशाला दिवा मिळेल, अशी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आस होती. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका गोंडस मुलीला जन्म दिला. वंशाचा दिवा न मिळाल्याने कृष्णाच्या मनात संताप खदखदत होता. रागाच्या भरात त्याने घरातच असलेल्या लाकडी दांडक्याने आपली तीन दिवसांची मुलगी राधिका हिच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here