कॉलेज कट्टा प्रतिनिधी-
चंद्रपूर:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनमजूरही सुरक्षित नसल्याचा प्रत्यय आला असून,वन विभागाच्या अकुशल नियोजनामुळे वेगवेगळ्या घटनेत वाघाच्या हल्ल्यात दोन वन मजुरांना आपला जीव गमावल्याची घटना उघडकीस आली आहे.ताडोबा बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू असताना अवघ्या पाऊण तासाच्या अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी मामला व महादवाडी बफर परिसरात या दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.प्रेमसिंग दुखी उदे (५५) रा. बालाघाट (मध्य प्रदेश) आणि बुदसिंग श्यामलाल मडावी (वय ४१), रा. मुंडला, बालाघाट (मध्य प्रदेश) अशी मृत वन मजुरांची नावे आहेत.
वनविभागाकडून बालाघाट जिल्ह्यातून मजूर बोलावून बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान वन विघागाकडून या मजुरांना राम भरोसे सोडून त्यांच्या सुरक्षिते सबंधाने कुठलीही उपाययोजना न केल्याने या दोन वनमजुरांचा वाघाच्या हल्यात दुर्दैवी अंत झाल्याचे बोलल्या जात आहे




