बेस्ट तहसीलदार प्रताप वाघमारे यांचा भावनिक निरोप समारंभ…

0
170

 

कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर(नरेंद्र सोनारकर):
2024 च्या सुरूवातीला अचानक लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारे यांची बदली झाली.युवा कवी मनाच्या तहसीलदार वाघमारे साहेबांनी जिव तोडून काम केलं…त्यांना अनंत परिश्रमाचे सहकारी मिळाले.त्या कामात स्वतः सोबत कार्यालयातील सहकारी, क्षेत्रीय स्तरावरील सहकारी यांच्या सोबत इतर विभागाचे तालुका स्तरीय अधिकारीही जिवाभावाचे मिळाले…तालुक्यात विविधांगी काम करून स्वसन्माना सोबतच तालुक्याचा सन्मानही वृध्दिंगत करून समाधान असल्याची प्रतिक्रिया ताजसीलदार वाघमारे यांनी व्यक्त केली असून,अनेक पायाभूत महसूली कामकाज, विविध नविन उपक्रम, शोषित वंचित लोकासाठी प्राधान्याने काम, दैनंदिन कामकाजासाठी विविध प्रारूपे, अनेक लोकांची कामे करण्यात सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.त्याचाच परिपाक म्हणून तालुका “मा.मुख्यमंत्री- 100 दिवसीय कार्यक्रम” यात अव्वल आला, मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते ” बेस्ट तहसीलदार ” अवार्ड मिळाला, मा. जिल्हाधिकारी व मा. उपविभागीय अधिकारी मॅडम यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन व
जबाबदा-या दिल्या, अनेकांचे सहकार्य, अनंताच्या शुभेच्छा यासह सरतेशेवटी मिळाला तो सहृदय निरोप..! अशा शब्दात तहसीलदार वाघमारे यांनी सहकार्यांचे आभार मानले असून,अतिशय मनापासून तहसील कार्यालयातील सर्वांनी व तालुक्यातील सर्व सहका-यांनी या काळात प्रचंड मेहनत केली, कार्यालय प्रमुख म्हणून मोलाची साथ दिली आणी त्यांनीच सरतेशेवटी भरभरून शुभेच्छासह सदिच्छा व्यक्त करत दिलेला निरोप दिला… अविस्मरणीय हा अस्मरणीय क्षण मी कधीच विसरू शकत नाही,अशी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी नागभीड तहसील कार्यालयातील टिम चे,नायब तहसीलदार उमेश कावळे, तालुका प्रशासन नागभीड चे आणी जिल्हा प्रशासन चंद्रपूर मनःपूर्वक धन्यवाद देत विशेष आभार मानले आहेत…

कवी मनाचे संवेदनशील व्यक्तित्व बेस्ट तहसीलदार मा.प्रताप वाघमारे यांचे कॉलेज कट्टा टीम च्या वतीने अभिनंदन…पुढील वाटचालीस अनंत सदिच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here