पुरोगामी’ फक्त पत्रकारांचा संघ नव्हे तर मानवतावादी मूल्ये रुजवणारा विचार आहे..!

0
100

 

नरेंद्र सोनारकर
——————
राज्य संघटक,पुरोगामी पत्रकार संघ

कॉलेज कट्टा न्यूज:
दिनांक 30 डिसेंबर 2025
बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या पुरोगामी पत्रकार संघाच्या 8 व्या वर्धापण दिनाच्या सदिच्छा व्यक्त करतांना आनंद होतोय…

पत्रकारिता ही समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनावे,सर्व जातीधर्माच्या पत्रकार बंधू- भगिनींनी पुरोगामी आणी परिवर्तनवादी महापुरुष आणी महानायिकांचा विचार घेऊन पुरोगामी महाराष्ट्राला समतावादी दृष्टीने आणखी बाळकट करण्यासाठी विजय सूर्यवंशी यांनी पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना केली.8 वर्षात हा संघ महाराष्ट्रातील विविध जिल्हे पदाक्रांत करत गुजरात,मध्यप्रदेश आणी तेलंगणात पोहचला…त्यामागे विजय सूर्यवंशी सरांचे संघटन कौशल्य, संघटनेप्रती अपार निष्ठा,त्याग,मेहनत आणी त्यांनी घडवलेले संघातील निष्ठावन पत्रकार मित्र यांचाही वाटा आहेच!

पत्रकारांचं जगणं,मरण,त्यांच्या समस्या,दबाव तंत्र,गोदी मीडिया यासारख्या बाबींचा बारकाईने अभ्यास करून सूर्यवंशी सरांनी स्थापन केलेला हा संघ फक्त पत्रकार संघ म्हणून मर्यादित न राहता तो राज्यातील सर्वात मोठा पत्रकारांचा परिवार म्हणून नवलौकिक पावतो आहे…एवढ्यावरच संघाचे काम नाही,तर शेतकरी,कष्टकरी,वाहतूक,साहित्यिक,आणी समाजिक क्षेत्रातील समूहाचे विविध उपसमित्या स्थापन करून प्रत्येक घटकाला समूहिक रीतीने संघटित रित्या न्याय देण्याचा प्रयत्न या पुरोगामी पत्रकार संघटनेतून होत आहे…

महाराष्ट्रात स्थापन झालेला हा संघ भारत सरकारच्या नोंदणीकृत संघांपैकी एक असून आता या संघाची ओळख राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ म्हणून झाली आहे.
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बळीराजा समिती,समाजातील अन्याया विरुद्ध लढणारी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती,साहित्यिक विचारवंतांसाठी पुरोगामी साहित्य संसद,दळण वळणातील अन्याय दूर करण्यासाठी वाहतूक समिती अशा विविध समित्यांद्वारे समाजातील परिवर्तनवादी समूह संघटनेशी जोडल्या जात असून,ज्यांना ज्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे त्या सर्वांना आपल्या हक्काचा विचार मंच उपलब्ध करून देणारा भारतात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हा पहिला पत्रकार संघ ठरला आहे…

महापुरुष,महानायिकांच्या,क्रांतिकारी संतांच्या विचारांचा वारसा घेऊन समतेची वज्रमुठ बांधून अन्याय,अत्यांचार,भ्रष्ट्राचार,अनिष्ठ रूढी परंपरा,अंधश्रद्धा यावर संघटित पणे हल्ला बोल करत या पुरोगामी पत्रकार संघाची आगेकूच सुरु आहे…भविष्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ देशाच्या प्रत्येक राज्यात पोहचुन पुरोगामी आंदोलनाचे समूहिक नेतृत्व करेल यात तिळभर शंका नाही…

परत एकदा दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या नेतृत्वात होऊ घातलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या 8 व्या वर्धापण दिनाच्या पुरोगामी च्या सर्व पदाधिकारी,सर्व उपसमितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना कोटी कोटी मंगल सदिच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here