वाचन आणी वैचारिक मंथनाच्या अधिक समृद्धीसाठी ‘सामाजिक ज्ञान स्पर्धेचे’ आयोजन…

0
82

 

कॉलेज कट्टा (एड.योगिता रायपूरे):
चंद्रपूर : बहुजन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सामाजिक जाणीव, विचारमंथन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी “खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० ते ३.३० या वेळेत मातोश्री विद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे होणार आहे. स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती”, प्रा. हरी नरके लिखित “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” आणि प्रा. अशोक राणा लिखित “स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ” या पुस्तकांवर आधारित आहे. विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार पाच हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय पहिल्या २० विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे समन्वयक डॉ. विवेक बांबोळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here