महापौर निवडणुकीची तारीख पुढे ढकला- देवेंद्र आर्य यांची मागणी
कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर प्रतिनिधी- महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी (३० जानेवारी) रोजी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली महापौर निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस ने राज्यपालांना उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या पालिका निवडणुकीचे निकाल १६ जानेवारी रोजी घोषित करण्यात आलेत. मात्र महानगरपालिका निवडणुका संपन्न होऊन तब्बल १४ दिवसा नंतर म्हणजेच ३० जानेवारी रोजी महापौर पदाच्या निवडणुकीचा दिनांक घोषित करण्यात आला.मात्र ३० जानेवारी हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्मृतिदिन असून, हा हुतात्मा दिवस भारतच नाही तर संपूर्ण विश्व, शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पावन स्मृतींना स्मरण करत त्यांच्या त्याग आणी बलिदानाची आठवण करून शोकमग्न होतो. नेमका तोच दिवस म्हणजे ३० जानेवारी रोजी महापालिकांच्या महापौर पदाची निवडणूक घोषित केल्या गेल्याने महात्मा गांधी यांच्या विचारांना मानणाऱ्या करोडो भारतीयांना दुःखद धक्का बसला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
एकीकडे अक्खे जग शोकसागरात बुडाले असतांना याच हुतात्मा दिवशी महापौर पदाची निवडणूक संपन्न होईल.दरम्यान विजयी उमेदवारांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत, आतिषबाजी आणी विविध पद्धतीने हा विजय साजरा करतील.हा मोठा विपर्यास नाही का..? असा प्रश्न उपस्थित करत पुरोगामी म्हणविल्या जाणान्या महाराष्ट्रतच महाराष्ट्र सरकार ने हेतूपुरस्पर महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी त्यांच्या पावन स्मृतींचा अवमान करण्यासाठीच नेमकी ३० जानेवारी ही तारीख निश्चित केल्याने आम्ही तीव्र शब्दात महाराष्ट्र शासनाचा निषेध करत असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.
दरम्यान मुंबईत गट स्थापनेसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ज्या प्रकारे मुंबई महापौर निवडणुकीसाठी मुदतवाढ देण्यात आली त्याच प्रकारे ३० जानेवारी या दिवसाचे गांभीर्य ओळखून महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी हेतूपुरस्पर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली तारीख पुढे ढकलून महात्मा गांधी यांनी देशासाठी दीलेल्या, त्याग बलिदानाची आठवण म्हणून त्यांच्या पावन स्मृतिदिनाचं पवित्र्य आणी गांभीर्य जोपसण्यात यावं,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
शहर काँग्रेस कमेटीचे माजी शहर अध्यक्ष तथा बल्लारपूर नगर पालिका उपाध्यक्ष देवेंद्र सत्यदेव आर्य यांच्या साहिनीशी हे निवेदन राज्यपालांना पाठवण्यात आले आहे.तर या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. हर्षवर्धन दादा सपकाळ प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई, मा. प्रतिभाताई धानोरकर,खासदार, चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र,मा. विजयभाऊ वडेट्टीवार विधीमंडळ गट नेते, महाराष्ट्र राज्य, मा. सुभाषभाऊ धोटे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी (ग्रामीण) यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी नगराध्यक्ष : अल्का वाढई,माजी नगराध्यक्षा डॉ.रजनीताई हजार.माजी नगराध्यक्ष छायाताई मडावी,
नगरसेविका : वैशाली हुमणे,
सुनीता जीवतोडे,अंकुबाई भुक्या
नगरसेवक ईस्माईल ढांकवाला तथा ताहेर हुसैन,मंगेश बावणे,चेतन भगत,मोहम्मद शेख,निखिल हुमणे,राजू पाववेकर,अंशुल
जया बानोत इ.कार्यकर्ते उपस्थित होते.




