काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांच्यावर यांच्यावर जीवघेणा हल्ला…
कॉलेज कट्टा ब्रेकिंग न्यूज-
अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
हल्लेखोरांनी पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने वार केल्याची माहिती असून, हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तातडीने त्यांना अकोटवरून अकोल्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून,
राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.पोलीस तपास वेगाने सुरू असून, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.




