कॉलेज कट्टा-
आकोट- राजकारणात कुठलीही विचारधारा स्थिर नसते.याचा प्रत्यय आकोट नगर पंचायतीच्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने सिद्ध झाला आहे.हिंदुत्वाचा टेम्भा मिरणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापने साठी चक्क असुुद्दीन ओवैशी यांच्या पक्षाशी हात मिळवणी केल्याने पक्षातील हिंदुत्ववादी नेते अनुत्तरीत झाले आहे.
आकोट नगर पंचायतीत भाजप ने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या असल्या तरी 35 जागा असलेल्या या नगर पंचायतीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने असुुद्दीन ओवैशी यांच्या एमआयएम या पक्षाला सोबत घेत आकोट विकास मंच स्थापन करत भाजप ने सत्ता स्थापने साठी दावेदारी केली आहे. आमदार रवी ठाकूर या विकास मंच चे गटनेते असतील.13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणी स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.माया धुळे या नगराध्यक्ष असून राष्ट्रीय काँग्रेसचे 6 सदस्य आणी वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य विरोधी पक्षात असणार आहेत.
काय आहे संख्यानिहाय पक्षीय सदस्य संख्या
आकोट नगर पंचायतीत 35 जागा आहे .त्यापैकी 33 जागांवर निवडणूक होऊन भाजपला 11,काँग्रेसला 5,शिंदेसेना 1,ठाकरे सेना 1,अजित पवार राष्ट्रवादी 2,शरद पवार राष्ट्रवादी 2,प्रहार चे 3 सदस्य आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी,दोन्ही शिवसेना आणी प्रहार सत्ता पक्षा सोबत...
भाजप प्रणित आकोट विकास मंच या आघाडीत ठाकरेंची शिवसेना,शिंदेंची शिवसेना,अजित पवार आणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सह बच्चू कडू यांच्या प्रहार चा ही समावेश असणार आहे.याआघाडीची नोंदणी अकोला जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून आघाडीतील सर्व घटक पक्षांना भाजपच्या विपचे पालन करणे आवश्यक ठरले आहे.




