अखेर काँग्रेस नेते हिदायत पटेल मृत्युशी झुंजतांना हरले…

0
96

 

कॉलेज कट्टा ब्रेकिंग न्यूज-
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
हल्लेखोरांनी पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने सफासफ वार केल्याने या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने त्यांना अकोटवरून अकोल्यात उपचारासाठी हलवण्यात आले.दरम्यान घाव अधिक खोल असल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही.अखेर मृत्युषी झुंज देत त्यांची प्राणज्योत मालवली…या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्हा हदरला आहे.राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हिदायत पटेल अकोला जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं नाव असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते पटेल यांनी घेतली असून, सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचे प्रचंड वर्चस्व होते. अकोला जिल्हा सहकारी बँकेचे ते संचालक होते. तसंच अको कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुद्धा पदाधिकारी होते. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस या हल्ल्यामागचा सूत्रधार व हल्ल्याचं कारण शोधत आहे.

हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर राज्यात हळहळ व्यक्त होत असून या हत्तेतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here