-
- कॉलेज कट्टा न्यूज:
चंद्रपूर-सत्य, अचूकता आणि जबाबदारीच्या मूल्यांवर आधारलेली पत्रकारिता ही लोकशाहीची ताकद आहे. असे प्रतिपादन आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले ते पोंभूर्णा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पोंभुर्णा तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.याचं कार्यक्रमाचा भाग म्हणून तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा सहपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात पुढे बोलतांना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकाराच्या लेखणीतील ताकदीचा आवर्जून उल्लेख केला.मुख्य अथिती म्हणून या कायक्रमाला उवस्थित राहतांना आपल्याला प्रचंड आनंद झाल्याचे सांगत निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि समाजहिताच्या भूमिका प्राधान्याने मांडणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी यावेळी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
आपल्या लेखणीतून समाजमन जागृत ठेवण्याचे हे पवित्र कार्य यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे चालू राहो. समाजातील वंचित, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने आवाज देणे हीच पत्रकारितेची खरी ओळख. आजच्या दिवसातून समाजहिताची भावना आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची वाट अधिक उजळली जावो, अशा शुभेच्छा याप्रसंगी दिल्या.




