अकोल्याचा वीर जवान वैभव लहाने दहशतवादा विरुद्ध लढतांना शाहिद…

0
74

 

कॉलेज कट्टा न्यूज
नागपूर- दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुपवाड येथे 07 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.43 वाजता
भारतीय सेनेतील महाराष्ट्रातील वीर वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले आहे.

वैभव लहाने हे भारतीय सेनेच्या 12 मराठा लाईट इन्फंट्री या तुकडीत कार्यरत होते. त्यांचा सेवा क्रमांक 2821790F असा आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे विदर्भात शोककळा आहे.

शहीद जवानांचा पार्थिव देह एअर इंडिया फ्लाइट AI-415 ने नागपूर येथे आणण्यात येणार असून, तो 09 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.05 वाजता नागपूर विमानतळावर पोहोचणार आहे. पार्थिवासोबत भारतीय सेनेचे अधिकारी व जवान उपस्थित राहणार आहेत.
शहीद जवानांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर (पोस्ट वडद), तालुका अकोला, जिल्हा अकोला येथे 09 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता होणार आहेत.

अंत्यसंस्कारावेळी शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार असून
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वैभव लहाने यांच्या बलिदानाने अकोला जिल्हा हळहळला आहे.

भारताचा वीर वैभव यांस कॉलेज कट्टा टीम कडून विनम्र सेल्युट…त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,ही कामना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here