कॉलेज कट्टा
चंद्रपूर- भर थंडीत चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार पायाला भिंगरी बांधून हा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत आहेत.जिल्ह्यात आणी चंद्रपूरात त्यांनी केलेल्या झंजावाती विकास कामांच्या जोरावर भाजप ची एकहाती सत्ता येईल असे वाटत असले तरी आ.जोरगेवार यांनी निवडणुकीपूर्वी चंद्रपूरकरांसाठी 200 युनिट फ्री विज देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र सत्ता स्थापने नंतर सत्तेत असूनही जोरगेवार यांनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याने विरोधकांनी 200 युनिट फ्री विजेचा मुद्दा उचलून धरला आहे.तर नागरिकही 200 युनिटचे काय झाले?असा प्रश्न उपस्थित करू लागल्याने हे 200 युनिट भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उतरलेल्या भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे…
दरम्यान आ.सुधीर मुनगंटीवार पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारापर्यंत त्यांनी केलेल्या विकासाचा अजेंडा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोकळ आश्वासने देऊन पाठ फिरवणे,जाती पोतजातीचे, विकासकामांचे श्रेय लाटत राजकारण करणे हे मुंगनटीवरांना कधीच जमले नाही.आजवरच्या त्यांच्या 35-40 वर्षाच्या राजकारणात त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे एकही उदाहरण नाही.दरम्यान चंद्रपूर महापालिका निवडणूक नेतृत्व सांभाळतांना त्यांना अनेक डॅमेज कंट्रोल करावे लागत आहेत.आपल्या पक्षातील नेते उपनेत्यांना सांभाळून घेत मुनगंटीवारांनी स्वतःला झोकून देत केलेले शर्थिचे प्रयत्न भाजप ला तारतील का?हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
काँग्रेस-भाजप समोर बंडखोरांचे मोठे आव्हान-
तिकिट वाटपात भाजप काँग्रेस मधील अंतर्गत वाद शिगेला पोहचला होता. या दोन्ही पक्षांकडून दिग्गजांना डावलाल्याने दोन्ही पक्षाच्या बंडखोरांनी पक्षाविरुद्ध दंड धोपटत आव्हान दिल्याने ही बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडेल हे सध्या सांगता येत नसले तरी दोन्ही पक्षातील बंडखोरांनी काँग्रेस भाजप ची डोकेदुखी वाढवली आहे,एवढे निश्चित!




