बल्लारपूरातील टेकडी परिसरात लवकरच पोलीस चौकीची स्थापना…अजय दुबे यांच्या पाठपुराव्याला यश!

0
84

बल्लारपूरातील टेकडी परिसरात लवकरच पोलीस चौकीची स्थापना…अजय दुबे यांच्या पाठपुराव्याला यश!

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील टेकडी परिसरात पोलीस चौकीची स्थापना व्हावी या मागणीला घेऊन कामगारनेते तथा पत्रकार अजय दुबे यांनी गेली अनेक वर्षा पासून पाठपुरावा केला.दरम्यान टेकडी परिसरात लवकरच पोलीस चौकीची स्थापना
केली जाईल, असे आश्वासन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अजय दुबे यांना दिले.त्या सबंधने मुख्यमंत्र्यांकडून विशेष मंजुरी घेतली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केल्याने शहराच्या टेकडी परिसरात लवकरच पोलीस चौकीची स्थापना होणार आहे.

८ जानेवारी रोजी भाजप कामगार मोर्चाचे राज्य सरचिटणीस अजय दुबे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना टेकडी परिसरात पोलीस चौकी बांधण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले. सुधीरभाऊ यांनी मुख्यमंत्री तथा गृह मंत्र्यांना पत्र लिहून, चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी भेट घेऊन, नागरिकांच्या सोई साठी लवकरात लवकर पोलीस चौकी स्थापन केली जाईल असे सांगितले. गरज पडल्यास, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित करता येईल,असेही शिष्ट मंडळाशी चर्चा करतांना ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अजय दुबे २०१६ पासून टेकडी परिसरात पोलिस चौकी बांधण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी चौकी स्थापनेबाबत ठाम आश्वासन दिले होते.

अलिकडच्या काळात या परिसरात गुंडगिरी, हिंसाचार, खून आणि बेकायदेशीर दारू दुकानांमध्ये वाढ झाली आहे. विशिष्ट परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने उघडपणे सुरू आहेत. कत्तलीसाठी येथे बेकायदेशीरपणे गुरे खरेदी केली जाता आहे.अवैध दारू दुकाने,कत्त्तल खाने यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एकंदरीत कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी येथे पोलिस चौकी आवश्यक आहे.

शहरात बहुतांशी पोलिस चौक्या आलापल्ली रोड राज्य महामार्गावर असल्याने आवश्यक मदत मिळण्यास आणि परिस्थिती नियंत्रित करण्यात विलंब आणि गैरसोय होत आहे.त्यामुळे टेकडी परिसरात पोलीस चौकी स्थापन होण्याची आवश्यकता असल्याचे अजय दुबे यांनी आ.मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

शिष्टमंडळात राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे मिथिलेश पांडे, मन्सूर खान, अयुब खान, वसंत अक्केवार इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here