आणी 8 तासाच्या चिमुर्डीने आपल्या वीर वडिलांना पहिला आणी शेवटचा सेल्युट दिला…!

0
122

 

कॉलेज कट्टा न्यूज
सातारा- सुखी संसाराची स्वप्ने फुलवत जीव मुठीत घेऊन सीमेवर खडा पहारा देणारा वीर जवान…त्यांच्या संसार वेलीवर इवलंस फुल उमलणार असल्याची गोड बातमी त्यांना मिळते.ते अधिकाऱ्यांना विनंती करून सुटीवर येतो.पत्नीच्या प्रसूतीची लगबग सुरु होते…काही तासातच इवलासा नवा जीव आपल्या जवळ असेल…अशी असंख्य स्वप्ने डोळ्यात साठवून आपल्या प्रिय बाळाचे या जगात स्वागत करण्यासाठी आतुर त्या वडिलांवरच काळ झडप घालतो…आणी आठ तासाच्या त्या चिमुर्डीला आपल्या वीर वडिलांना सेल्युट द्यावा लागतो..!

ही ह्रदय पिळवत पिळवटून टाकणारी घटना सातारा तालुक्यात घडली.सातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे पोस्ट आरे येथील रहिवासी, भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरीग्रह परिसरात अपघाताने मृत्यू झाला. देशसेवेसाठी सदैव सज्ज असलेला हा जवान, पत्नीची प्रसूती जवळ आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर घरी आला होता. आठ दिवसांपूर्वी आनंदाच्या अपेक्षेने आलेले प्रमोद जाधव, लेकीच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होते…

पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.त्यांचा अपघातात मृत्य झाला… अवघ्या काही तासांतच पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं. वडील होण्याचा आनंद डोळ्यांनी पाहण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला… ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. मागे दुःखाचा डोंगर घेऊन पत्नी, वृद्ध वडील आणि आता जन्मलेली चिमुकली लेक असा परिवार राहिला आहे. एका सैनिकाचं आयुष्य असंच क्षणात संपून जावं, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.
देशासाठी जगलेला हा जवान आज आपल्यात नाही,त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी त्यांच्या कुटुंबिया सोबत ही आठ तसांची चिमुर्डीही आपल्या वीर वडिलांना पहिला आणी शेवटचा सेल्युट देण्यास उपस्थित होती….सर्वांच्या डोळ्यात धारा होता.उपस्थित असलेल्या प्रत्येकांचे अंतकरण जड झाले होते….काळाने या वीर जवाना सोबत आणी नियतिने या आठ तासाच्या चिमुर्डी सोबत खेळलेला विचित्र खेळ कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
कॉलेज कट्टा टीम आभाळ कोसळलेल्या वीर जवानाच्या कुटूंबाच्या दुःखात सहभागी आहे…वीर जवान प्रमोद जाधव यांना विनम्र सेल्युट…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here