पतीचा मर्डर करून 2 कोटींसह प्रियकरा सोबत मज्जा मारण्याचा गेम फसला..!

0
131

 

कॉलेज कट्टा न्यूज ब्युरो-
शेजारील राज्य तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात पतीच्या हत्येचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने तिच्या प्रियकर आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या संगनमताने हा गुन्हा केला. पोलिस चौकशीत आरोपी पत्नीने २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.

हे प्रकरण निजामाबाद जिल्ह्यातील मकलूर मंडळातील बोरगम गावातील रहिवासी पलनाती रमेश यांच्या हत्येशी संबंधित आहे. रमेशचा विवाह सुमारे १३ वर्षांपूर्वी नवीपेट मंडळातील जन्नेपल्ली गावातील रहिवासी सौम्या हीच्याशी झाला होता. रमेश एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करत होता, तर सौम्या निजामाबादमधील एका खाजगी शाळेत शिक्षिका होती.

विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत काम करत असताना सौम्याचे त्याच शाळेत पीटी शिक्षक असलेल्या दिलीपशी अवैध संबंध निर्माण झाले. रमेशला या संबंधाची जाणीव झाली आणि त्याने अनेक वेळा याचा विरोध केला. त्यानंतर सौम्या आणि दिलीपने रमेशला संपवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली.

योजनेचा एक भाग म्हणून, दिलीपने त्याचा नातेवाईक अभिषेक, जो मकलूर मंडलमधील मादापूर गावचा रहिवासी होता, त्याच्याशी संपर्क साधला. अभिषेकने दिलीपची ओळख जितेंद्रशी करून दिलीपला, जो एक कंत्राटी किलर होता. जितेंद्रच्या माध्यमातून, आणखी तीन लोकांना हत्येच्या कटात सामील करण्यात आले. सौम्याने तिची अंगठी गहाण ठेवली आणि ३५ हजारांची सुपारी आडवान्स म्हणून दिली.

ऑगस्ट २०२५ मध्ये, रमेश आरमूरहून निजामाबादला जात असताना, कंत्राटी किलर्सनी त्याच्या दुचाकीला कारने धडक देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून रमेश बचावला आणि त्याने मकलूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पत्नी, प्रियकर आणि सुपारी किलरला अटक, एक आरोपी फरार…
यानंतर सौम्या आणि दिलीप आणखी एक संधी शोधत होते. १९ डिसेंबरच्या रात्री जेवणानंतर सौम्याने पाण्यात दहा झोपेच्या गोळ्या मिसळून रमेशला दिल्या. जेव्हा तो गाढ झोपेत गेला तेव्हा सौम्याने दिलीपला फोन केला. कॉन्ट्रॅक्ट किलर्सशी संपर्क साधता न आल्याने दिलीप स्वतः अभिषेकसोबत बोरगम गावात गेला. दोघांनी रमेशचा टॉवेलने गळा दाबून आणि उशीने गुदमरून त्याचा खून केला.

पतीच्या हत्ते नंतर रचले नाटक-
हत्येनंतर सौम्याने मृत्यू हा हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. तथापि, रमेशच्या वाहिनीने इस्रायलमध्ये कामा निमित्त राहणाऱ्या केथिर याला फोन वरून घडलेला प्रकार सांगितला. त्याने परदेशातून मकलूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर, २४ डिसेंबर रोजी, मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत दुसरे शवविच्छेदन करण्यात आले, ज्यामध्ये खून झाल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान आरोपी पत्नीने खूप कागांवा केला.”विधिवत अंत्यसंस्कार झाले आहेत.कबरीतून प्रेत बाहेर काढाल तर माझ्या पतीला मोक्ष कसे मिळेल..? म्हणत तीने प्रचंड विरोध केला होता…

फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू
पोलिसांनी सौम्या, तिचा प्रियकर दिलीप, अभिषेक आणि सुपारी किलर टोळीतील सदस्यांना अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मोहसीन नावाचा एक आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. चौकशीदरम्यान, रमेशकडे ₹२ कोटी पेक्षा जास्त किमतीची विमा पॉलिसी असल्याचे उघड झाले आणि ती मिळविण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here