यवतमाळ जिल्यातील शेंदुरसानी ग्रामपंचायतीत जन्मनोंदी चा ‘महाघोटाळा’…राज्यभर खळबळ…

0
58

 

कॉलेज कट्टा ब्युरो-
यवतमाळ- जिल्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसानी या ग्रामपंचायतीत जन्म मृत्यू नोंदणीचा महाघोटाला उघडकीस आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

गावाची लोकसंख्या फक्त 1500 पण 27 हजार 397 जन्माच्या नोंदी !
शेंदुरसनी गावात दीड हजार लोकसंख्या आहे. काही महिन्यांतच हजारो बनावट जन्मनोंदी केल्या गेल्या, ज्यात बिहारमधील एका व्यक्तीला अटक झाली असून, हे प्रकरण सायबर गुन्ह्याशी संबंधित असल्यचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे आणि अशा नोंदी रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या CRS (Civil Registration System) सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या.सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या काळात या नोंदी करण्यात आल्या.

या प्रकरणात एकाला अटक;
बिहारमधील एका व्यक्तीला या महघोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, या नोंदी स्थानिक नसून सायबर माध्यमातून केल्या गेल्याचे तपासात समोर आले आहे.

हा केवळ तांत्रिक बिघाड नसून एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे कारस्थान असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकृत लॉगइन आणि पासवर्डचा वापर करून किंवा प्रणाली हॅक करून हे बनावट दाखले तयार करण्यात आल्याचा संशय आहे.हे बनावट जन्म दाखले पासपोर्ट मिळवण्यासाठी, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी किंवा इतर सरकारी योजनांचा अवैध लाभ घेण्यासाठी वापरले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हे दाखले कोणाच्या नावावर वितरीत झाले आणि यामागे कोणते रॅकेट काम करत आहे, याचा तपास सायबर पोलीस आणि महसूल विभाग संयुक्तपणे करत आहेत. या प्रकारामुळे राज्यातील पंचायतींच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here