कॉलेज कट्टा न्यूज
बीड- महाराष्ट्रात पुरोगामित्वाचे कितीही डंके पिटत स्त्री- पुरुष समानतेचा गाजा वाजा होत असला तरीही अनेक ठिकाणी जन्म घातलेल्या मुली वयात येण्याआधीच कुटुंबाला भार वाटू लागतात.आणी त्यातून उरकल्या जातो गैर कायदेशीर बाल विवाह…असाच धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पिंपळादेवी येथे उघडकीस आला आहे.
येथील एका कुटुंबाने आपल्या १४ वर्षीय मुलीचा २७ वर्षीय युवकाशी झालेला बालविवाह उरकला.मात्र याची गुप्त माहिती पोलिसां पर्यंत पोहचली.पोलिसांनी हा बाल विवाह उधळून लावत ही गंभीर घटना उघडकीस आणला आहे
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या बनावटी आधारकार्ड वर १९ वर्ष वय-
मुलीच्या नातेवाईकांनी बनावट आधार कार्ड तयार करून तिचे वय १९ वर्षे असल्याचे भासववुन
हा विवाह २३ डिसेंबर रोजी पिंपळादेवी येथील एका मंगल कार्यालयात उरकला होता.
बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुलीची सुटका केली. उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या पथकाने मुलीचे समुपदेशन करून तिचे जबाब नोंदवले आहेत.गेवराई पोलीस ठाण्यात ‘बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान याच
गेवराई तालुक्यातीलच आम्ला गावातील एका अन्य घटनेत १४ वर्षीय मुलीचा ३० वर्षीय पुरुषाशी झालेला विवाहदेखील पोलिसांनी उधळून लावला असून या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




