कॉलेज कट्टा न्यूज ब्युरो
चंद्रपूर-राज्यध्यक्ष पदाची निवडणूक मतदानाद्वारे घेऊन लोकशाही आणी परदर्शिता सिद्ध करणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हा पहिला पत्रकार संघ ठरला आहे.
दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य अध्यक्ष पदाची निवडणूक शांततेत पार पडली.वॉट्सऐप वर संपन्न झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्यातील सर्व सभासदांनी सहभाग नोंदवला.तसेच संघाच्या उपसमित्यांनीही मतदान केल्याने मतदानाची टक्केवारी ९५ टक्के झाली.या निवडणुकीत पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष पदासाठी विष्णू कंकाळ हे माईक या चिन्हावर तर शंकरशींग ठाकूर पेन हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उभे होते.महत्वाचे म्हणजे राज्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवल्याने ही निवडणूक ऐतिहासिक झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.शिंदे,विनोद परमार यांनी उत्तमरित्या कार्यभार सांभाळला.
मतदारांसह उमेदवारांचीही धाकधुक वाढली-
या निवडणुकीत ९५ टक्के मतदान झाल्याने कोण विजयी होईल? याबाबत महाराट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले असून,या चुरशीच्या निवडणुकीमुळे उमेदवार आणी मतदारांची धाकधुक वाढली आहे.
निवडणूक निकाल केव्हा?
1 मार्च 2026 रोजी मालेगाव येथील पत्रकार संमेलनात नव्या राज्यध्यक्षांची घोषणा केली जाणार असून तब्ब्ल 10 दिवस मतदार आणी उमेदवारांना वाट बघावी लागणार आहे.दरम्यान मतमोजणी करून निकाल हा गुप्त ठेवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.कॉलेज कट्टा न्यूज परिवारा तर्फे निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवारांना सदिच्छा…!




