लॉज मधील रूम नंबर 205 मध्ये घडलं तरी काय..?

0
270

 

कॉलेज कट्टा ब्युरो-
संभाजीनगर: आर्थिक अडचणीत असलेल्या एका तरुणीने मित्राकडे पैसे मागितले,
त्याने तिला लॉजवर बोलवलं. दोघांनी मद्यप्राशन केलं. त्यानंतर ती फोनवर बोलत रुमबाहेर गेली, मात्र परत येताना तिने चुकून १०५ ऐवजी २०५ क्रमांकाचं दार ठोठावलं. यावेळी खोलीत मद्यपान करत बसलेल्या तिघा मित्रांनी संधी साधली. ३० वर्षीय तरुणीला ओढत आत नेऊन बळजबरीने दारु पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही खळबळजनक घटना छत्रपत संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉज मध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपास करून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

पीडितेला बळजबरीने बियर पाजून तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला. पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास पीडित महिलेने आरोपींच्य तावडीतून सुटका करून बाहेर पळ काढला. आरडा ओरड करत वेदांत नगर पोलीस ठाणे गाठले. तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार वि पोलिसांना सांगितला.

हॉटेलमध्ये खोली बुक करताना वापरलेल्या मोबाईल क्रमांका च्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र आरोपींनी मोबाईल बंद केला होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील यातील घनश्याम भाऊलाल राठोड वय २७, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय २५, दोघे राहणार न्यू शांती निकेतन कॉलनी जवाहर नगर, किरण लक्ष्मण राठोड वय २५, राहणार भानुदास नगर असे अटक करण्यात आलेल्या रोपींची नावे आहेत.

अनेक तर्क वितर्काला फुटले पेव:
पीडित महिलेनी आपल्या मित्राला मदत मागितल्यावर तिला लॉजवर बोलवून मद्यपान करण्याचे कारण काय?तिच्या मित्रानी स्वतःच जाऊन तीची मदत का केली नाही?रात्री 11 वाजता सदर पीडित महिलेनी लॉजवर जायला हवे होते का..?रूम नंबर 105 आणी रूम नंबर 205 यातील अंतर तिला कळले नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून,या बाबत अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here