बल्लारपूरातील प्रभाग क्र 9 मधून कोण बाजी मारणार..?

0
94

 

कॉलेज कट्टा न्यूज बल्लारपूर-
बल्लारपूर- अगदी अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलेल्या प्रभाग क्रमांक 9 ची चुरस अधिक वाढली आहे.अनेक आरोप प्रत्यारोपत शहरात गाजलेली ही निवडणून अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे.

उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी नगर परिषद सदस्य पदासाठी पार पडणाऱ्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रा.नागेश गंडलेवार,भारतीय जनता पक्षा कडून निलेश खरबडे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने नासिर खान तर शिव सेना (उबाठा)च्या वतीने मनोज बेले निवडणूक रिंगणात आहे.प्रा.नागेश गंडलेवार हे सुशिक्षित उमेदवार असून त्यांना पालिकेतील कार्याचा चांगला अनुभव आहे.त्यांनी यापूर्वीही पालिकेत नगर सेवक म्हणून सेवा दिली आहे.तर भाजपचे उमेदवार यांनीही पालिकेत नगर सेवक काम केले असून त्यांचा स्पष्टपणा जनतेशी असलेले आपुलकीचे संबंध यामुळे त्यांची बाजू मजबूत मानली जात आहे.काँग्रेसच्या नासीर खान यांच्या कडे पालिकेच्या काम काजाचा मोठा अनुभव आहे.नगर सेवक ते पालिका उपाध्यक्ष पर्यंत त्यांनी सेवा दिली आहे.तर शिवसेनेची मशाल घेऊन पहिल्यांदा आपले नशीब आजमावणारे मनोज बेले यांचा मोठा जनसंपर्क,पत्रकार मंगेश बेले यांचे पत्रकारितेतील सातत्य आणी समाजिक कार्यातील सहभाग यांच्या जोरावर निवडणूक रिंगणात उभे आहेत.

चारही ताकदीचे उमेदवार रिंगणात असल्याने,प्रत्येक उमेदवार व्यक्तगत रित्या आपापल्या क्षेत्रात पारंगत असल्याने प्रभाग क्रमांक 9 चे मतदार कोणाला पसंती दर्शवतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.दरम्यान 21 डिसेंबर रोजीच प्रलंबित निवडणूक निकाला सोबत याही प्रभागातील निकाल लागणार असल्याने या प्रभागातून कोण नगर सेवक होईल? यासाठी मतदारांना अधिकची वाट बघावी लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here