कॉलेज कट्टा न्यूज
सोलापूर- आपल्या प्रेयशीच्या लहानग्या चिमुकल्याची शी कपड्याला लागल्याचे दिसताच त्या नराध्यमाने त्याला मारहाण करत गळा दाबून त्या चिमुकल्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सोलापूर हादरले आहे…
मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत असा की एका महिलेचे स्वजातीय अविवाहित पुरुषा सोबत विवाह बाह्य सबंध होते.ती आपल्या पतीला सोडून आपल्या चिमुकल्या मुलासह सोलापुरात आपल्या प्रियकरा सोबत राहायला आली होती.तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याचे नाव फरहान असून शाहनाज असे त्याच्या आईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर रोजी रात्री तीन वर्षांचा चिमुरडा फरहान झोपलेला असताना त्या लहान बाळाची शी मौलालीच्या कपड्याला लागली होती. त्या मौलानीने चिमुकल्याला मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला.हा प्रकार लक्षात आल्यावर शहनाज ने बेशुद्ध अवस्थेत फरहानला येऊन विजयपूर येथे गेली मात्र, विजयपूरातील एसटी स्टँडवर पोहोचताच आरोपी मौलालीने घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेनंतर पत्नी शहनाजने आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने तीन वर्षीय फरहानला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र. डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
बॉयफ्रेंडविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य बघत त्या चुमुकल्याचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्या अहवालातून फरहानचा गळा दाबण्यात आला असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी आता शहनाजचा बॉयफ्रेंड मौलाली विरोधात विजयपूर पोलीस ठाण्याच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, नंतर ही घटना सोलापुरातील असल्याने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे.




