दोन सख्ख्या भावांनी मिळून आई वडिलांना संपविले…आणी रेल्वे ट्रेकवर जीव देऊन केली आत्महत्या…

0
192

 

कॉलेज कट्टा न्यूज नांदेड :

जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर आली असून, दोन्ही मुलांनीच आपल्या आई वडिलांचा गळा दाबून खून केला, त्यानंतर स्वतः दोघांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याने या खून आणी आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे….

शवविच्छेदनाच्या आहवालानंतर खुनाचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारड पोलिसांनी दोन्ही मृतक मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक विवचनेतून हा प्रकार घडल्याचं समोर येत असलं तरी आई वडिलांची हत्या करून स्वतः रेल्वे ट्रेक वर जीव देण्यामागे दोन्ही मुलांची काय हतबलता होती? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे गंभीर प्रकरण का घडलं? कारण अजूनही गुलदस्त्यात…
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. यात रमेश लखे (वय 51), राधाबाई लखे (वय 44) हे घरात मृत अवस्थेत आढळून आले होते. तर त्यांची दोन्ही मुलं उमेश लखे (वय 25) आणि बजरंग लखे (वय 22) यांचे मृतदेह गावापासून काही अंतरावर असलेल्या मुगट रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे पटरीवर आढळून आले.मृतक राधाबाई ही महिला रोज सकाळी जवळील मंदिरात पूजेला जात होती.पण घटनेच्या दिवशी ती मंदिरात न दिसल्याने काही जागरूक नागरिकांनी. चौकशी केली असता हा हदरवून टाकणारा भयंकर प्रकार् उघडकीस आला.दरम्यान दोन्ही मुलांनी आई वडिलांची हत्या केल्या नंतर दोघांनी स्वतः रेल्वे ट्रेक वर जाऊन गाडीखाली कटून का आत्महत्या केली? याचे उत्तर पोलिसांना शोधावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here