उन्नाव गँग रेप आरोपी,खुनी कुलदीत सेंगर जेल मधेच सडणार..?

0
96

 

कॉलेज कट्टा ब्युरो-
दिल्ली-उन्नाव बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती देत त्याला जमीन मंजूर केला होता.मात्र कुलदीप सेंगर तुरुंगाबाहेर आल्यावर तो पीडिता आणी तिच्या कुटुंबियाला त्रास देईल,या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण हाऊ शकतो, अशी भीती उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व्हायवरने व्यक्त केली होती. दरम्यान सेंगर याच्या जमिन विरुद्ध जागरूक महिलांनी न्यायालया समोर तीव्र निदर्शने आणी आंदोलन केले होते.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कुलदीप सेंगर आता तुरुंगातच राहील असे बोलल्या जात आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं म्हटलं आहे की “आम्हाला माहीत आहे की जेव्हा ट्रायल कोर्ट किंवा उच्च न्यायालय एखाद्या दोषी किंवा अंडरट्रायल आरोपीला जामिनावर सोडते, तेव्हा या न्यायालयानं सामान्यतः त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकल्याशिवाय अशा आदेशाला स्थगिती देऊ नये.”

“मात्र, या प्रकरणातील परिस्थिती वेगळी आहे, कारण आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 304-II अंतर्गतही दोषी ठरवण्यात आलं आहे. हे प्रकरण संबंधित महिलेच्या वडिलांच्या हत्येशी निगडित आहे, आणि याच प्रकरणी तो कोठडीत आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्वाळ्या मुळे कुलदीप सेंगर हा जेल मधेच सडणार असल्याच बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here