
RPI आठवले गटाचे BJP कार्यालया समोर निदर्शने…
कॉलेज न्यूज
पुणे- आंबेडरकरी विचारांचा गाशा गुंडाडून भाजपा ला बिनशर्थ पटींबा देत मागच्या दारातून खासदारकी भोगत मंत्रिपद मिरवणाऱ्या रामदास आठवले यांना दर निवडणुकीत आपली नामुष्की लपविण्यासाठी भाजप ला काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याचा आजर्व करावा लागतो…दरम्यान प्रत्येक निवडणुकीत भाजप रिपब्लिकन (आठवले) पक्षाला एकही जागा सोडणार नाही,हे माहित असूनही रामदास आठवले यांचा दर निवडणुकीत हा ठरलेला कार्यक्रम असतोच!
रामदास आठवले यांनी महायुतीने जगा वाटपात आपल्याला भाजप ने विश्वात न घेता जागा वाटप केल्या आहे,असा आरोप करत मुंबईत पक्षाला 15 जागा सोडण्याची मागणी केली आहे.तर पुण्यात देखील पक्षाला जागा सोडण्याची मागणी केली आहे.या पार्श्वभूमीवर RPI (आठवले)च्या कार्यकर्त्यांनी पुणे BJP कार्यालया समोर पक्षाला जागा सोडण्यांच्या मागणी साठी निदर्शन केल्याने आठवले यांच्या मवाळ भूमिकेवर नेहमी प्रमाणे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महायुतीत आठवलेला एकही जगा न मिळाल्यास काय होईल..?
मनपा निवडणूकित युती धर्माचे पालन करत भाजप ने आठवले गटाला जागा सोडाव्यात हे नियमात असतांना जर भाजप ने आठवलेला जागा सोडल्या नाहीत तर आठवले यांच्या भूमिकेत कुठलाही बदल न होता ते सर्व गप गुमान सहन करून पुन्हा ‘मोदी मोदी’ च करतील,असे राजकीय जगाणकारांचे मत आहे.भापाच्या सत्तेवर परिपूर्ण अवलंबून असलेल्या आठवलेंना कार्यकर्त्यांच्या भावनेशी कुठलेही घेणे देणे नसले तरीही त्यांना आपल्या अस्तित्वस्साठी प्रत्येक निवडणुकीत जागा मागण्याची नामुष्की ओढावते व ठरल्या प्रमाणे भाजप त्यांच्या मागणीला कवडीचा भाव न देता एकही जागा देत नाही,हे आजवर महाराष्ट्राने बघितले आहे.
BJP च्या पुणे कार्यालयापुढे आंदोलनाचे औचित्य काय..?
RPI आठवले गटाच्या पुणे पदाधिकाऱ्यांनी भाजप च्या पुणे कार्यालया समोर आंदोलन आणी प्रदर्शन केले.पण नेताच जेव्हा स्वतःच्या मागल्या दारातील खासदारकीत आणी मंत्रिपदात खुश असेल तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करायला त्यांच्याकडे वेळ असेल का..? वारंवार आजर्व करूनही भाजप त्यांना जागा सोडत नसेल तर कठोर भूमिका घेणे गरजेचे नाही काय..? पण प्रत्येक निवडणुकीत जागा मागायच्या आणी मिळाल्या नाहीतर गप्प बसायचे अशी भूमिका नेत्याची असल्याने कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे औचित्य काय..?असा प्रश्न उभा ठाकला आहे.



