कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर-प्रतिनिधि: दिनांक २ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या नगर पालिका निवडणुकीत काही पत्रकारही निवडणूक रिंगणात उभे होते.दरम्यान त्यांनी अवैध मार्गाने पैसा कमवून निवडणुकीत मतदाराला पैसा वाटला या आशयाची बातमी प्रसिद्ध करून स्वतःला मोठा पत्रकार सिद्ध करण्यासाठी त्याने “समाजाचा आदर्श असलेल्या पत्रकाराने वाटले लाखो रुपये” या उप शीर्षकाखाली बातमी लिहून पत्रकारितेचा फायदा घेत दुसऱ्या मार्गाने पैसा कमवून निवडून येण्यासाठी पैसा वाटला,असा या बातमीतून गंभीर आरोप केला. आहे.त्यातच सबंधित पैसा वाटणाऱ्या पत्रकारांनी पत्रकारांची अब्रू वेशीवर टांगून पत्रकारितेला कलंक ठरविले” या आशयाची बातमी प्रसिद्ध केली. आता महत्वाचा मुद्दा असा की,पैसा वाटल्या जातोय हे माहित असूनही या पत्रकाराने आपली सक्रिय पत्रकारिता दाखवत पोलीस किंवा प्रशासनाला तक्रार करून त्यांचेवर कार्यवाही का केली नाही?एक पत्रकार म्हणून लोकशाही वाचण्याची याची जबाबदारी नव्हती का? बातमी लिहितांना पुराव्या दाखल स्वतःकडे पुरावा म्हणून सुरक्षित ठेवण्यात आलेले पैसा वाटप करतानाचे फोटो,व्हिडीओ हा पत्रकार प्रशासनाला देईल का…?शोध पत्रकारितेच्या नावावर अधिकारी,कर्मचार्यांना टार्गेट करून “पुढच्या अंकात” ची धमकी देऊन,एखाद्या भ्रष्ट कर्मचाऱ्याच्या, अधिकाऱ्याच्या विरुद्ध बातमी प्रकाशित झाल्यावर “चिरीमिरी” करत त्याची पोपटपंची करत पांढरपेशी पत्रकाररिता करणारा हा पत्रकार स्वतःला गंगेपेक्षा शुद्ध समजत जर पत्रकारितेवरच घाला घालत असेल तर शहरातील पत्रकार संतप्त होणार नाही का..?
अलीकडे “पुढच्या अंकांत वाचा” चा दम भरून आपली रोजी रोटी चालवणाऱ्या या स्वयंघोषित ‘राजा हरिश्चंद्र’ पत्रकारा विरुद्ध स्थानिक पत्रकार काय भूमिका घेतात..?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




