“एक वही – एक पेन : महापरिनिर्वाण दिनी शिक्षणाला नवी दिशा”

0
217

कॉलेज कट्टा- राजुरा: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, ६ डिसेंबर २०२५ रोजी जय भीम मित्र मंडळ, राजुरा यांच्यातर्फे समाजोपयोगी ‘एक वही – एक पेन’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. शिक्षण हा अधिकार असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील शंभर नागरिकांनी वह्या व पेनांचे दान करत सामाजिक बांधिलकी जपली. जमा झालेल्या वह्या–पेनांचे वितरण परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.

उपक्रमाचा प्रारंभ गोपिकाबाई सांगडा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वितरणाने झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला. त्यानंतर अनुदानित आश्रम शाळा, सिंधी येथेही वह्या–पेनांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची साथ मिळाली आहे. महापरिनिर्वाण दिनी अशा पद्धतीने शिक्षणातून आदरांजली वाहण्याचा जय भीम मित्र मंडळाचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

शिक्षणाला हातभार लावणारा हा समाजोपयोगी उपक्रम पुढील काळातही व्यापक प्रमाणात राबविण्यात यावा, अशी जनतेची अपेक्षाही यावेळी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here