चंद्रपूरात ‘200 युनिट’ च्या फुसक्या बार ने भाजप चा घेतला बळी…

0
127

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर- पोकळ आश्वासने,मी पणा,उत्सव प्रियता,श्रेय वाद,अहंकार,चंद्रपूरला ग्रेसलेलं प्रदूषण,त्यावर विधानसभेत अवक्षरही न बोलणारे आमदार…सदैव जनतेच्या सेवेत काम करणाऱ्यांच्या मुनगंटीवारांच्या कामात काड्या करणारे काडीबाज राजकारण अखेर भाजपला भोवले असून,विकास कामांचा एजेंडा घराघरात पोहचविण्यासाठी पायाची भिंगरी करणाऱ्या सुधीर मुंनगंटीवर यांच्या जिव्हारी हा पराजय लागला असेल तर नवल नको..!

उमेदवार निवडीपासून तर एबी फॉर्म वाटप प्रकरणी भाजप नेत्यांमध्ये झालेली खिचातांन,वर्चस्वाची लढाई…यामुळे येथील मतदार संभ्रमात सापडला.चंद्रपूरातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात विकासाला गती देणाऱ्या मुनगंटीवारांना एकाकी पाडून त्यांचे खच्चीकरण करण्याचा डाव आखणाऱ्या नेत्यांचेही या पराज्याने वाभाडे निघाले आहेत…शेवटी आपल्या बॉस ला उत्तर देतांना त्यांना मुंनगंटीवार कसे अपयशी ठरले याची उत्तरे त्यांना शोधावी लागणार असली तरी या पराजयांचे खापर मुनगंटीवार यांच्यावर कदापि फोडता येणार नाही.कारण पोकळ आणी बिनबुडाची आश्वासने न देता त्यांनी होईल तेवढा विकास साधन्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसने बहुमतांचा पल्ला गाठत चंद्रपूर मनपा मध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे.दरम्यान भाजप च्या पराजयाचे खापर मुनगंटीवार यांच्यावर फोडून त्यांचे अंतर्गत शत्रू त्यांची उंची कमी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत,मात्र 200 युनिट बीज मोफत करण्याचे दिलेले आश्वासन,येथील जीवघेणे प्रदूषण,वाढता कॅन्सर सारखा दुर्दर आजार…यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तथा पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here