तर चंद्रपूरात काँग्रेसचा महापौर..!

0
66

तर चंद्रपूरात काँग्रेसचा महापौर..!

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर- संख्याबळाच्या तुलनेत भाजप कमजोर वाटत असली तरी काँग्रेस मधील अंतर्गत वादामुळे याचा फायदा भाजप ला होऊन त्यांचा महापौर बसेल अशी शक्यता वार्तविली जात असतांनाच काँग्रेसच्या अंतर्गत वादावर अखेर पडदा पडल्याने चंद्रपूरात काँग्रेसचा महापौर बसण्याची चिन्हे आहेत.

ताज्या राजकीय घडामोडींनुसार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे की, चंद्रपुरात पाचही वर्षे काँग्रेसचाच महापौर असेल. महापौर कोण होणार याचा अंतिम निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेतील. सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ जुळवण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महापौरपद ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने काँग्रेसकडून संजीवनी वासेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
६६ सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी ३४ या जादुई आकड्याची गरज आहे. काँग्रेसकडे २७ तर भाजपकडे २३ नगरसेवक आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत ८ नगरसेवकांचा गट स्थापन केला असून, जो पक्ष महापौरपद देईल त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
थोडक्यात, काँग्रेस अंतर्गत वाद मिटल्याने आता पक्षाकडून अधिकृत नाव जाहीर होणे बाकी असले तरी,महापौर पदाची स्वप्ने बाळगून ८ जनांचा वेगळा गट स्थापन करणाऱ्या शिवसेना (उबाठा)आणी वंचित यातून एकाला उपमहापौर पद देऊन काँग्रेस महापौर बनवून सत्तेची धुरा सांभाळणार असे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here