क्रीडा मंत्रिमाणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात..?

0
59

कॉलेज कट्टा न्यूज
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे लागलेला शनीगिरा काही केल्या संपताना दिसत नाही. विविध वादग्रस्त विधानांमुळे त्यांची कृषीमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना 2 वर्षे कारावास आणि 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आता न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. हा निकाल माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एम बदर यांनी कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षे कारावास आणि 10 हजार दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे तसेच या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं आहे. या प्रकरणी जामिनासाठी आता माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here