क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्री पदासह आमदारकीही जाणार..?

0
49

 

कॉलेज कट्टा न्यूज ब्युरो-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे. सदनिका घोटाळ्यात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान, कोकाटेंची खाती कोणाला द्यायची? असा स्पष्ट सवाल फडणवीस यांनी अजितदादांना केल्याची विश्वसनीय माहिती आहे.

कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची बातमी कॉलेज कट्टा न्यूज ने आधीच प्रसारित केली होती.कोकाटे यांच्या विरुद्ध राजकीय हालचालींना वेग आल्याने कॉलेज कट्टाची ती बातमी खरी ठरल्याचे वाचक वर्गाचे मत आहे.

कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र, नेहमीच ते चर्चेत आहेत. कृषिमंत्री असताना त्यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा सगळीकडे रंगली होती तर चार
महिन्यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे फडणवीस यानी कोकाटेकडील कृषीखाते
दत्तात्रय भरणे यांना दिले होते. तर कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले होते.
शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना 2 वर्षे कारावास आणि 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आता न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. हा निकाल माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून कोकाटे यांचे कुठल्याही क्षणी मंत्रिपद आणी आमदारकीही जावू शकते,असे राजकीय वर्तुळात भाकीत केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here