कॉलेज कट्टा न्यूज
वृत्त विश्लेषण-नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी दावे-प्रतिदावे करण्यात आले.काँग्रेसचे तत्कालीन वरिष्ठ नेते घनशाम मुलचदांनी यांनी पक्षाकडे आपल्या सुनबाई साठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली.एन वेळेवर ती नाकारत पक्षाने डॉ. अल्का अनिल वाढई यांना पक्षाची उमेदवारी दिली.मात्र घनशाम मुलचंदानी यांनी थेट शिवसेनेची मशाल हातात घेत आपल्या सुनबाई चैताली मुलचंदानी यांना निवडणूक रिंगणात उतरविले…पक्षानी अन्याय केल्याच्या भावनेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही.त्यांनी जोमात मोर्चे बांधणी केली.अख्खे शहर पिंजून काढले…दुसरीकडे डॉ. अनिल वाढई यांची लोकप्रियता,जनतेप्रती असलेली संवेदनशीलता,आपुलकी हिच काँग्रेसच्या उमेदवार अल्का अनिल वाढई यांच्या विजयाचे गमक मानल्या जात होते…शिवसेना (उबाठा),राष्ट्रीय काँग्रेस आणी भाजपात काट्याची टक्कर होणार असल्याचे एकूण समीकरण असतांनाच निवडणूक निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असतांना शहर काँग्रेस मध्ये काहीच आलबेल नाही हे सिद्ध झाले…
काय आहे नेमका गोंधळ..?
निवडणूक निकाल काही दिवसावर येऊन ठेपला असतांना विरोधी उमेदवारांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत पक्षाने देवेंद्र आर्य यांना शहर अध्यक्ष पदावरून निलंबित करत अध्यक्ष पदाचा प्रभात करीम भाई यांना दिला.या संबंधाने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ.अलका वाढई यांनी पक्ष श्रेष्ठीकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे.त्याच तक्रारीची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी तक्रारीची कुठलीही चौकशी न करता देवेंद्र आर्य यांची शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली.दरम्यान याचा जाब विचारण्यासाठी देवेंद्र आर्य यांच्यासोबत काँग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढणारे सदस्य पदाचे उमेदवारही डॉ.अनिल वाढई यांच्या घरी गेल्याची विश्वासनीय माहिती आहे.
निवडणूक निकाला नंतर काय..?
21 डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.अशा वेळी शिवसेना उमेदवार चैताली मूलचदांनी यांना काँग्रेस पेक्षा अधिक मते मिळाल्यास डॉ. अल्का वाढई यांनी वरिष्ठांकडे केलेली तक्रार ग्राह्य धरली जाईल.पण काँग्रेसच्या अल्का वाढई यांना शिवसेने पेक्षा अधिक मते मिळाल्यास..? हा प्रश्न सद्यातरी अनुत्तरीत असला तरी या विरुद्ध शहर काँग्रेसचे निलंबीत अध्यक्ष देवेंद्र आर्य यांची काय भूमिका असेल,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान मशाल हातात घेऊन बंडखोरी वरिष्ठ नेते घनशाम मुलचंदानी निवडणुकी नंतर काँग्रेस मध्ये परत येतील का?डॉ. अल्का वाढई यांची काय भूमिका असेल?कुठल्याही चौकशी शिवाय तडकाफडकी अध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आलेले देवेंद्र आर्य यांचा काय पवित्रा असेल..? आणी नवनिर्वाचित शहर अध्यक्ष या एकूण बाबींना कसे हातळतील..? हे 21 डिसेंबर ला लागणाऱ्या निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.




