देवेंद्र आर्य यांनी पक्ष विरोधी कार्य केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करा- नासिर खान,एड.मेघा भाले यांची व्हिडीओ क्लिप वायरल…

0
141
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

कॉलेज कट्टा- बल्लारपूर:
निवडणूक निकाल काही दिवसावर येऊन ठेपला असतांना प्रभाग क्रमांक 9 (अ) मधून सदस्य पदाची निवडणूक लढलेल्या महिला शहर अध्यक्ष एड.मेघा भाले आणी याचं प्रभागातून ओबीसी प्रवर्गातून उभे असलेले काँग्रेस चे अधिकृत उमेदवार नासिर खान यांनी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा गांभीर आरोप एक व्हिडीओ क्लिप जारी करत लावला आहे…

व्हिडीओ क्लिप मध्ये नासिर खान यांनी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधून मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असून भाजपच्या वतीने निलेश खरबडे यांना उमेदवारी दिली आहे.मात्र देवेंद्र आर्य यांचे निलेश खरबडे यांच्या सोबत हित सबंध असल्याने या प्रभागातून मला पराभूत करून भाजप च्या निलेश खरबडे यांना विजयी करण्याचे कट कारस्थान रचल्या जात असल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे.याच व्हिडीओ मध्ये आपल्याला काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळू नये यासाठी देवेंद्र आर्य यांनी टोकाची भूमिका घेतल्याचा आरोपही नासिर खान यांनी केला आहे.

तर एड.मेघा भाले यांनी देवेंद्र आर्य यांच्यावर गंभीर आरोप लावत आर्य यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अल्का वाढई यांचा प्रचार न करता शिवसेनेच्या चैताली मूलचंदानी यांच्या साठी मते मागितल्याचा आरोप केला आहे.याबाबत ऍड. मेघा भाले यांच्याशी संपर्क केला असता “या बाबत प्रभाग क्रमांक 6 मधील मतदार महिलांचे कॉल रेकार्डिंग आपल्याकडे पुरावा म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान नासिर खान आणी एड.मेघा भाले यांनी देवेंद्र आर्य यांचे शहर अध्यक्ष पदावरून निलंबन केले तसे काँग्रेसच्या सदस्य पदावरून निलंबीत करावे अशी मागणी व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून केली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here