नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या डॉ. अल्का वाढई विजयी

0
186

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत शेवट पर्यंतच्या धाकधुक वाटणाऱ्या निवडणुकीत अखेर डॉ. अल्का वाढई यांचा विजय झाला.
पहिल्या फेरीपासून डॉ. अल्का वाढई यांनी मुसंडी मारली होती.पण मध्यंतरी मोठे अंतर कापत भाजप च्या रेणुका दुधे बरोबरीने येऊन ठेपल्या होत्या.सहाव्या फेरीत तर फक्त एक मताने त्या अल्का वाढई यांच्या पेक्षा कमी होत्या.नेमकं कोण निवडून येईल ? हे कुणालाच ठरवता येत नव्हतं… आठव्या फेरी पर्यंत अत्यंत सस्पेंस वाटणाऱ्या या निकालात अखेर राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ. अल्का वाढई विजयी घोषित करण्यात आले.

भाजपच्या निकट
प्रतिद्वंदी. रेणुका दुधे यांना एकूण 14 हजार 392 मते मिळाली तर काँग्रेसच्या अल्का वाढई यांना 14 हजार 602 मते मिळाली.शिवसेना (उबाठा) गटाच्या चैताली मूलचंदानी यांना 10 हजार 602 मते मिळाली…

एकंदरीत या निवडणुकीत काँग्रेसने चौफेर बाजी मारली असून,आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवरांना विजयाच्या शुभेच्छा देत पक्षाने झालेल्या दारून पराभवावर मन्थन करण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here