कॉलेज कट्टा (नरेंद्र सोनारकर)
बल्लारपूर- पालिका निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व सिद्ध करत नगराध्यक्ष पदासह एकूण १७ जागांवर घावघवीत यश मिळवत भाजप चा धुव्वा उडवला आहे…
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या अल्का अनिल वाढई यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत २१५ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांना १४ हजार ६०७ मते मिळाली, तर भाजपच्या रेणुका दुधे यांना १४ हजार ३९२ मते मिळाली. शिवसेनेच्या (उबाठा) च्या चैताली मुलचंदानी यांना १० हजार ६०२ मते मिळाली.
नगरसेवकांच्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागांवर विजय मिळवत पालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपला ७, शिवसेना (उबाठा) गटाला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, शिवसेना (शिंदे गट) ला १ तर अपक्ष उमेदवाराने १ जागेवर विजय मिळवला आहे.
कोण आहेत विजयी उमेदवार..?
प्रभाग क्रमांक 1)मधून लखनसिंह चंदेल (भाजपा) छाया मडावी (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 2) मधून मोहित डांगोरे (भाजपा) वैष्णवी जुमडे (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 3) मधून पवन मेश्राम व शिल्पा चुटे (दोन्ही काँग्रेस)प्रभाग क्रमांक 4 मधून महेंद्र ढोके (भाजपा) व अमकुबाई भिक्या (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 5 मधून सिक्की यादव व रंजिता बिरे (शिवसेना उबाठा) प्रभाग क्रमांक 6) मधून देवेंद्र आर्य व मोना धानोरकर (दोन्ही काँग्रेस),
प्रभाग क्रमांक 7 मधून अब्दुल करीम व वैशाली हुमने (दोन्ही काँग्रेस),प्रभाग क्रमांक 8 मधून मुकद्दर शेख, व प्रियंका थुलकर (काँग्रेस)प्रभाग क्रमांक 9 मधून मनोज बेले (शिवसेना उबाठा), मेघा भाले (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 10 मधून सुमित (उर्फ गोलू) डोहने व साजीया शेख (राका अजित पवार),प्रभाग क्रमांक 11 मधून इस्माईल ढाकवाला व शारदा माकोडे (दोन्ही काँग्रेस),प्रभाग क्रमांक 12 मधून सुनीता जिवतोडे (काँग्रेस) निरज झाडे (भाजपा),प्रभाग क्रमांक 13 मधून किरणसिंह चंदेल व शालू कुमरे (दोन्ही भाजपा),प्रभाग क्रमांक 14 मधून काजल तोटावार (राष्ट्रवादी काँग्रेस) रवि मातंगी (काँग्रेस),प्रभाग क्रमांक 15 मधून प्रणित सातपुते (राष्ट्रवादी काँग्रेस) व रजनी मुलचंदानी (शिवसेना उबाठा),प्रभाग क्रमांक 16 मधून अविनाश मट्ठा (शिवसेना शिंदे गट) विजयी झाले.प्रभाग क्रमांक 18 मधून विद्या खरतड (भाजपा) व सलीम नबी अहमद (अपक्ष) यांनी बाजी मारली आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमित डोहने यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा मिळवला असून,काँग्रेसच्या छाया मडावी यांनी अवघ्या तीन मतांच्या धक्कादायक फरकाने विजय संपादन केला आहे.




