बल्लारपूर पालिकेत सिक्की यादव यांची सलग सहाव्यांदा ऐतिहासिक एंट्री…

0
71

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर-नगर परिषदेच्या इतिहासात मोठी नोंद करत सलग शिवसेना (उबाठा) पक्षातून सहाव्यांदा नगरसेवकपदी निवडून येण्याचा बहुमान सिक्की यादव यांना मिळाला असून, बल्लारपूरच्या राजकारणात त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सिक्की यादव यांनी प्रथमच सन १९९६ मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या २००१, २००६, २०११, २०१६ निवडणूक जिंकली. तसेच सोबतीला तीन ते चार नगरसेवकांना निवडून आणत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. नुकत्याच झालेल्या २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी
मोठ्या मताधिक्याने विजय मिळवित सोबतीला ५ नगरसेवक निवडून आणत अखंड विज्याती मुहूर्तमेढ रोवली…. जनतेचा विश्वास संपादन करत सलग सहा वेळा निवडून येणे ही केवळ निवडणूक यशाची नव्हे, तर सातत्यपूर्ण लोकसेवेची पावती मानली जात आहे.

नगर परिषदेत त्यांनी उपाध्यक्ष, तसेच आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापती म्हणून जबाबदारी सांभाळत उल्लेखनीय कामगिरी बजाविली. स्वच्छता मोहिमा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न आणि शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. विशेषतः शहरातील गोरगरीब, कष्टकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने रस्त्यावर उतरलेले दिसले, त्यामुळे ते कायम चर्चेत राहिले. नागरिकांच्या समस्या माझ्या समस्या आहेत, या भूमिकेतून काम करणारे सिक्की यादव हे २४ तास उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. कुठलाही भेदभाव न करता मदतीसाठी तत्पर राहणे हीच त्यांची राजकीय ओळख बनली आहे. या निवडणुकीत त्यांनी केवळ स्वतःचा विजय मिळविला नाही, तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी दीपाली मुलचंदानी यांना सक्षमपणे मैदानात उतरवित भाजप व काँग्रेससारख्या पारंपरिक पक्षांना जोरदार आव्हान दिले होते हे विशेष!

या लढतीत दहा हजारांहून अधिक मते मिळवत त्यांनी राजकीय ताकद सिद्ध केली. यासोबतच पाच नगरसेवक निवडून आणण्यातही ते यशस्वी ठरले, हे विशेष उल्लेखनीय आहे. सिक्की यादव यांच्या या विजयाकडे मतदारांनी दिलेली निरंतर लोकसेवेची पावती म्हणून पाहिले जात आहे. बल्लारपूरच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी त्यांची लढाई अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा आता शहरवासीय व्यक्त करीत आहेत.