कॉलेज कट्टा न्यूज
ठाणे-अनेक गुन्हे दाखल असलेल्या विशेषतःह खासदार संजय राऊत आणी त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयूर शिंदे यांना अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे…
हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरदस्तीनं वसुली असे गुन्हे त्याच्यावर आहेत. मकोका अंतर्गत त्याच्यावर खटला चालला आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाईदेखील झालेली आहे. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्याला अटक करण्यात आली होती.
मयूर शिंदेनं गेल्या ८ दिवसांत ३ पक्ष बदलले आहेत. मयूर शिंदे २२ डिसेंबरपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय होता. पण शिंदेसेनेकडून निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज येताच मयूर शिंदेनं पक्ष बदलला. २३ डिसेंबरला त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या पक्षप्रवेशाला भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे उपस्थित होते. मयूर शिंदेला सावरकर नगर प्रभाग क्रमांक १४ मधून उमेदवारी हवी होती. पण भाजमधूनही संधी मिळणार नाही, याची जाणीव शिंदेला झाली आणि त्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेर अजित पवारांनी त्याला तिकीट दिलं. मयूर शिंदेनं अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला.




